नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. ते आज सांगली इथं क़ृषी आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आत्तापर्यंत खरीप हंगामातील ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी सांगितलं.