मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ प्रतिबंधासाठी लावलेला लॉकडाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. मास्कचा वापर, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, संमेलनांवर निर्बंध आणि इतर उपाययोजना ३१ जुलैपर्यंत चालू राहतील, असं त्यात म्हटलं आहे. खाजगी कार्यालयं दहा कर्मचारी किंवा दहा टक्के उपस्थिती यातल्या कमी असलेल्या क्षमतेने चालवायला हरकत नाही. शक्यतोवर घरुन काम करण्यावर भर द्यावा असं आदेशात म्हटलं आहे.
लॉकडाऊनचा सध्याचा टप्पा उद्या संपणार असला, तरी राज्यात तो पूर्णपणे हटवला जाणार नाही, याचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केला होता.