नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आज पाळण्यात येत आहे. थोर अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी प्राध्यापक महालनोबिस यांना ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त आज एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंग नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बिबेक देबरॉय त्यात भाग घेणार आहेत.

यंदाच्या सांख्यिकी दिनाची संकल्पना ‘उत्तम आरोग्य, स्वास्थ्य आणि लैंगिक समानता’ असं आहे.