नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातल्या सुमारे 5 कोटी लोकांना मोफत दिलं जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलंय.

यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समित्यांनाना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं ही औषधं तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी, असे निर्देश दिले आहेत. ही खरेदी प्रक्रिया आणि वाटप तीन आठवड्यात पूर्ण करावं, असंही जिल्हा परिषदांना कळवलं असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.