नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून टप्प्याटप्प्यानं सैन्य मागे घेण्यावर तसंच लवकरात लवकर परस्परांमधला तणाव दूर करण्यावर जोर दिला आहे. लडाखमध्ये सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत.  चीनची पीपल्स  लिबरेशन आर्मी- पी.एल.ए. आणि  भारतीय लष्कराच्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये काल भारतीय प्रदेशातल्या  ‘चुशुल’ इथं काल रात्री चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्री  एस. जयंशकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यामध्ये 17 जून रोजी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने कालची बैठक होती. सध्याच्या परिस्थितीवर जबाबदारीनं मार्ग काढण्यावर, तसंच ६ जून रोजी झालेल्या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून  आपलं सैन्य मागे घेण्यावर   काल दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.