मुंबई : जर्मन बायोटेक फर्म बायोएनटेक आणि अमेरिकन फार्मास्युटिकलमधील अग्रगण्य पीफायझरने संभाव्य लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बरेच आशादायी वातावरण आहे. अमेरिकेने सादर केलेल्या सकारात्मक व्यापारी आणि आर्थिक आकडेवारीमुळे तसेच जगभरातील लॉकडाउनसंबंधी निर्बंध कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याला नाकारले त्यामुळे बुधवारी स्पोट गोल्डचे दर ०.६० टक्क्यांनी घसरून १७७० डॉलर प्रति औसांवर बंद झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
तथापि, चीन आणि भारताच्या काही भारगात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने पिवळ्या धातूच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून व्यवहार्य आणि प्रोत्साहनपर योजनांमुळे शून्याजवळ व्याजदर मिळाला असून सोने हाच गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरण्यास मदत झाली.
कच्च्या तेलाचे दर बुधवारी दर १.४० टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ३९.८ डॉलर किंमतीवर स्थिरावले. कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेमुळे जगातील बऱ्याच भागांमध्ये हवाई वाहतुकीवर कठोर निर्बंध घातले गेले आहेत. २६ जून २०१२ रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या क्रूड इन्व्हेंटरी लेव्हलमध्ये घट झाली असून आठवड्यात ७.२ दशलक्ष बॅरलचा साठा झाला. अमेरिकेतील कारखान्यातही उत्पादन वाढले असून निर्मितीतही वृद्धी झाली.
लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई)वर बेस मेटलच्या किंमती वाढल्या. चीन या जगातील सर्वात मोठ्या धातूच्या ग्राहकाने दर्शवलेल्या सकारात्मक आकडेवारीमुळे हे परिणाम दिसून आले. यामुळे मागणी वाढली असून किंमतीलाही आधार मिळाल्याचे दिसून आले.
एलएमई कॉपरचे दर ०.७६ टक्क्यांनी वाढून ६०६१ प्रति टनांवर स्थिरावले. कारण चिलीतील खाण बंद पडल्यामुळे जगभरातील पुरवठ्यावर परिणाम झाला. रेड मेटलच्या किंमतीत वाढीला अमेरिका आणि चीनने तयार केलेल्या वाढत्या आर्थिक आकडेवारीनेही आधार दिला.