नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची महाविद्यालये आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील महाविद्यालये यांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी या जागा वाढवल्या असून महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा उपलब्ध केल्या आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 700 तर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 450  जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशात 360 आणि उत्तर प्रदेशात 326  जागा उपलब्ध असतील. विविध राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची आकडेवारी याप्रमाणे:-

2019-20 या वर्षात आर्थिक मागासवर्गाला 10 टक्के कोट्यांतर्गत एमबीबीएस च्या राज्यनिहाय वाढीव जागांची यादी  
अनु. क्र. राज्य वाढीव जागा  
 
1 आंध्र प्रदेश 360  
2 आसाम 174  
3 बिहार 190  
4 छत्तीसगढ 120  
5 दिल्ली 115  
6 गोवा 30  
7 गुजरात 700  
8 हरियाणा 110  
9 हिमाचल प्रदेश 120  
10 जम्मू-काश्मिर 85  
11 झारखंड 30  
12 केरळ 155  
13 मध्य प्रदेश 270  
14 मणिपूर 25  
15 महाराष्ट्र 970  
16 ओदिशा 100  
17 पद्दुचेरी 30  
18 पंजाब 100  
19 राजस्थान 450  
20 तेलंगणा 190  
21 त्रिपुरा 25  
22 उत्तर प्रदेश 326  
23 उत्तराखंड 75  
24 पश्चिम बंगाल 450  
  एकूण 5200

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.