नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या मिळून २ हजार २०० कोटी रुपयांची  मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत जप्त केली आहे, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

DHFLचे प्रवर्तक कपिल आणि धिरज वाधवान यांच्या मालमत्ता देखील जप्त केल्या आहेत. केंद्रीय अन्वेषण संस्थांनी वाधवानच्या विदेशातल्या मालमत्ता देखील ताब्यात घेतल्या आहेत. येस बँकेनं ४ हजार ३०० कोटींचे बेकायदेशीर कर्ज DHFL ला दिलं होतं. राणा कपूरला केंद्रीय संस्थांनी मार्च मध्ये अटक केली होती.