नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
Covid 19 साथीच्या काळात परीक्षा घेणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. परीक्षांसंदर्भात UGC विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली. ‘स्पीक अप फॉर स्टुडन्टस्’ या विद्यार्थी प्रश्नासंदर्भात काँग्रेसकडून चालवल्या जाणाऱ्या अभियानात राहुल गांधी यांनी सहभाग घेत ट्विटर संदेश पाठवला आहे.