नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाहआरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धननीती आयोगाचे सदस्यकॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी देशातील विविध भागातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आणि सर्व राज्यांच्या सज्जतेची माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त पाळण्याबाबत वारंवार सांगितले जावेअसे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. कोविड बाबतची माहिती आणि जागृती व्यापक स्तरावर केली जावी आणि संक्रमण पसरणार नाहीयासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत असेही पंतप्रधान म्हणाले. या विषयात  आपल्याला दीर्घकाळ लढायचे असून कुठेही थांबायचा विचार करायलाही जागा नाहीअसे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध राज्यात कोविडची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त याचे पालन करण्याबाबत लोकांशी वारंवार बोलायला हवे असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. कोविड संदर्भातील सर्व माहिती प्रसारित करायला हवी आणि हे संक्रमण अधिक पसरणार नाहीयाची काळजी घ्यावीअसे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 च्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतकेंद्रराज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. दिल्ली लगतच्या NCR भागात कोविडचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील हाच दृष्टीकोन असावाअसे पंतप्रधान म्हणाले.

अहमदाबाद येथे ‘धन्वंतरी रथा’च्या माध्यमातून निरीक्षण आणि घरात राहून घ्यावयाची काळजीया यशस्वी उपक्रमाची चर्चा या बैठकीत करण्यात आली आणि इतर ठिकाणीही हा उपक्रम राबवण्याचे सांगण्यात आले. सर्व राज्यातजिथे जिथे कोरोनाचे अधिक रुग्ण आहेतत्यांना मार्गदर्शन आणि रियल टाईम देखरेख करण्याची व्यवस्था केली जावीअसे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.