मुंबई : संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हॅवलेट पकार्ड (एचपी) या कंपनीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनिओ नेरी यांनी कंपनीच्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. राज्यातील स्मार्ट सिटीज, ई-हेल्थ केअर, एआय-स्किल इंडिया अशा विविध क्षेत्रात एचपी कंपनी काम करीत आहे. यापुढेही राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वाय-फाय तंत्रज्ञानाशी निगडीत विविध प्रकल्पात काम करण्यास स्वारस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘हॅवलेट पकार्डसोबत राज्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत. आता या प्रकल्पांना आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे. यामुळे विविध क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उपयुक्तता सिद्ध होईल.’