नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

राज्यांनी श्वसनासाठी झडप असणारे N95 मास्क वापरण्यावर आपापल्या राज्यात बंदी घालावी, तोंड आणि नाक पूर्णपणे झाकण्याच्या नियमांचं पालन करावं, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.