नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारनं राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे. या चारधामांमधे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे.

यात्रेसाठी राज्यात प्रवेश केल्यानंतर, सर्व भाविकांना कोरोना चाचणी करणं अनिवार्य असून बहात्तर तासापर्यंत या चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल, तो निगेटिव्ह असेल तरच यात्रा करता येईल.

अन्यथा त्यांना १४ दिवस विलगीकरणात रहावं लागेल, त्यात सात दिवसांचं संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य असेल, असं अशी माहिती, देवस्थान विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अधिकारी रवीनाथ रमण यांनी दिली. प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना मात्र यात्रेसाठी परवानगी नाही.

यावर्षी बद्रीनाथसाठी दररोज बाराशे, केदारनाथसाठी आठशे, गंगोत्रीसाठी सहाशे आणि यमुनोत्री साठी चारशे भाविकांना दर्शनाची परवानगी आहे.