नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.

एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं आणि पांच टन हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवलं होतं. या मदतीची परतफेड म्हणून ही मदत आपण करत आहोत, असं इस्रायलनं म्हटलं आहे.