नवी दिल्‍ली : “जन्माष्टमीच्या या शुभदिनी मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

भगवान श्रीकृष्ण आपल्याला न्यायपूर्ण, संवेदनशील आणि दयाळू अशा समाजाची स्थापना करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचा कर्मयोगाचा संदेश कोणत्याही फळाची अपेक्षा करण्याऐवजी आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंदित करण्याचे आवाहन करतो. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात अग्रभागी राहून कार्य करणाऱ्या आमच्या सर्व कोरोना योद्ध्यांच्या कामांमधून हीच भावना स्पष्टपणे दिसून आली आहे.

हा सण साजरा करतांना आपण सर्वजण आपल्या जीवनाच्या आणि मानवतेच्या प्रगतीसाठी भगवान श्रीकृष्णाच्या शाश्वत आणि सार्वभौम शिक्षणाचे पालन करण्याचा संकल्प करूया.” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हंटले आहे.

राष्‍ट्रपतींच्‍या हिंदीतल्‍या संदेशासाठी येथे क्लिक करा