मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकाला NABCB या संस्थेकडून ISO मानांकनं मिळालं आहे. आता सोलापूर विभागातल्या नगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबुर्गी, शिर्डी, किलोस्करवाडी, कुर्डुवाडी या स्थानकांनाही ISO मानांकनानं गौरवण्यात आलं आहे.
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी या स्थानकांचं मानांकन स्वीकारलं. विभागातल्या सर्वाधिक म्हणजे नऊ स्थानकांनी आत्तापर्यंत ISO मानांकन पटकावलं आहे.
पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण, सौरउर्जेचा वापर, प्लास्टीकमुक्त स्थानक, यांत्रिकीकृत साफसफाई, कचऱ्याचं निर्मूलन, प्रवाशांची जनजागृती अशा बाबी मानांकनासाठी विचारात घेतल्या गेल्या.