शेअर बाजारातून पर्यायी उत्पन्न कसे मिळवावे हे शिकविण्याचा
सेकंड इन्कम ट्रेडिंगचा पद्धतशीर, अनुभवांती सिद्ध मार्ग

मुंबई : पर्यायी उत्पन्न निर्मितीसाठी सेवा देणाऱ्या ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’ या ‘स्टार्टअप’चा आज येथे शुभारंभ झाला. शेअर बाजारातील गुंतवणुकींमधून लोकांना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग मिळवून देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. पद्धतशीर गुंतवणूक कशी करावी, हे शिकवणारे ‘इ-लर्निंग मॉड्यूल’ ही कंपनी सादर करीत आहे. त्यातून बाजारातून स्थिर स्वरुपाचे उत्पन्न मिळवण्यास लोकांना मदत होईल.

कंपनीचे संस्थापक प्रकाश जाधव हे एक आर्थिक तज्ज्ञ आहेत. कंपनीचा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी माध्यम म्हणून ‘इ-लर्निंग’ सुविधा पुरविण्याची त्यांची योजना आहे.

सेकंड इन्कम ट्रेडिंगचे संस्थापक प्रकाश जाधव म्हणाले, “कोविड-19’च्या साथीने जागतिक स्तरावर सर्व उद्योगांवर तीव्र परिणाम झाला आहे.  एमएसएमई असो, मोठे उद्योग असो वा उद्योजक, या सर्वांनाच या साथीचा व टाळेबंदीचा फटका बसला आहे. त्यातही घरखर्च, कर्जांचे हप्ते, शाळांचे शुल्क, वैद्यकीय बिले आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी मासिक उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांना सर्वात जास्त झळ बसली आहे. या नागरिकांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हे खर्च फेडण्यातच जात असतो. नोकरी गमावण्याचे व बेरोजगाराचे प्रमाण सर्वच क्षेत्रांत मोठे आहे. अशा वेळी उत्पन्नाच्या पर्यायी स्रोत मिळाल्यास, लोकांना आपले सामान्य जीवन जगण्यास मदत होईल, तसेच त्यांचे स्वतःचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे भवितव्य साकारण्यासही सहाय्य होईल.’’

जाधव पुढे म्हणाले, “आर्थिक सुरक्षिततेची आवश्यकता ज्यांना असते, त्यांच्यासाठी ‘सेकंड इनकम ट्रेडिंग’ ही जीवनवाहिनी आहे. तज्ज्ञांकडून व समुपदेशनाद्वारे तार्किक प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना नवीन पद्धतशीर तंत्रे शिकण्यास मदत करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. नियमित व्यावसायिक, छोटे व्यापारी आणि घरातून काम करणारे या सर्वांना शेअर बाजारातून व गुंतवणूकीतून पैसे मिळविता यावेत, हा आमचा दृष्टिकोन आहे. शेअर बाजारात नफा कमावताना केवळ चांगले विश्लेषण करता येणे पुरेसे नसते, तर भावनांवर नियंत्रण आणि जोखमीचे चांगले व्यवस्थापन करणे हेदेखील आवश्यक असते. हे सर्व पार पाडण्यासाठी, चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय शेअर बाजारात यशस्वी होणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. ‘सेकंड इन्कम ट्रेडिंग’च्या परस्परसंवादी ‘ऑनलाईन कोर्स’द्वारे सर्व कौशल्ये लोकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.”

ही कंपनी ‘इ-लर्निंग ऑनलाईन लाइव्ह कोर्स’ देऊ करते. त्यामुळे त्यास जगातील कोठूनही हजेरी लावली जाऊ शकते. गुंतवणूकींद्वारे उत्पन्न कसे मिळवायचे याविषयी यामध्ये सल्ले देण्यात येतात. त्याद्वारे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत तयार करण्यासाठी कौशल्य शिकण्यात गुंतविला गेलेला वेळ आणि पैसा मिळू शकतो.