पिंपरी : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पी.एम.पी.एम.एल. परिवहन सेवा देशामध्ये संचारबंदी लागू झाल्यापासून बंद करण्यात आलेली होती. दि.०३ सप्टेंबर २०२० पासून २५ टक्के पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठक महापौर पुणे महानगरपालिका यांचे दालनात आज आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर तथा संचालक सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे व पुणे महापालिकेचे महापौर तथा संचालक श्री. मुरलीधर मोहोळ, पिं.चिं. मनपा आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, तसेच मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राजेंद्र जगताप, तसेच संचालक पी एम पी एम एल आदि उपस्थित होते.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील लोकप्रतिनिधी, सन्मा. पदाधिकारी, विद्यार्थी, कामगार तसेच नागरीकांकडून दैनंदिन पी.एम.पी.एम.एल. बससेवा सुरु करण्याची ब-याच दिवसांपासून वारंवार मागणी करण्यात येत होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सर्व शासकीय सुचना, नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सींग पाळून गणेश विसर्जनाची गंर्दी लक्षात घेता दि.०३ सप्टेंबर २०२० पासून २५ टक्के पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करत असताना बस आसन क्षमतेच्या ५०टक्के प्रवाशांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी कोरोना संसर्गा पासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी सर्व शासकीय सुचना नियमांचे पालन करत मास्क व सॅनिटायझच्या वापरासोबतच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन प्रवास करावा असे आवाहन यावेळी केले.