नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय महीला आणि बाल कल्य़ाण मंत्रालयानं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२१ साठी नामांकन पत्र मागवले आहेत. या महीन्याची १५ तारीख शेवटची तारीख आहे. विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार या दोन श्रेणींंमधे हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पुरस्कार प्राप्त मुलांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली राजपथ वर संचलनात सहभागी होण्याचा मान मिळतो.