मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जगभराती आर्थिक सुधारणांचे नकारात्मक संकेत दिसून येत आहेत. अमेरिका-चीनदरम्यान वाढता ताण आणि अमेरिकी डॉलरच्या सुधारणेमुळे कच्चे तेल व बेस मेटलच्या किंमतीवर मर्यादा आल्या. तथापि, सोन्याने सकारात्मक व्यापार केला आणि आर्थिक सुधारणेबाबत चिंता वाढत असूनही गुंतवणूकदारांना आकर्षित केले असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.
अमेरिका आणि चीन या दोन महास्ततांमधील तणाव वाढत असल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.११ टक्क्यांनी वाढले व ते १९३०.० डॉलर प्रति टनांवर बंद झाले. कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने लवकरात लवकर आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळत आहेत.अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने पिवळा धातू इतर चलनधारकांसाठी महाग झाला. यामुळे अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीलाही प्रोत्साहन मिळाले. तथापि, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आगामी महिन्यांमध्ये कमी व्याजदर आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांच्या वातावरणाचे दिशानिर्देश दिले आहेत. जागतिक आर्थिक सुधारणेच्या वाढत्या चिंतेमुळे पिवळ्या धातूकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला. त्यामुळे एमसीएक्सवर सोने वधारेल, अशी अपेक्षा आहे.
कच्चे तेल: जागतिक साथीमुळे मागणीची चिंता वाढली. त्यामुळे डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचे दर ७.५% नी घसरले व ३६.८ डॉलर प्रति बॅरलने कमी झाले. अमेरिकी डॉलरमध्ये सतत सुधारणा होत असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आणखी घसरल्या. कोरोना विषाणूच्या जगभरातील संसर्गामुळे निर्माण झालेल्या मंदीत जागतिक तेल बाजार संघर्ष करत आहे. आजही एमसीएक्सवर कच्चे तेल घसरणीचा व्यापार करेल, असे वाटते. यासोबतच, जगातील सर्वात मोठा कच्चे तेल निर्यातदार देश सौदी अरेबियाने आशियासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी केली. तसेच, अमेरिकी कंपन्या नव्या तेल पुरवठ्याच्या दिशेने शोध घेतल्यानेही तेलाचे दर घसरले.
ओपेक आणि सदस्यांनी १७ सप्टेंबर रोजी, सध्याच्या तेल बाजाराचे मूल्यांकन करण्याकरिता बैठक आयोजित केली आहे. डॉलरमध्ये सुधारणा, जागतिक मागणीत घट आणि मंद आर्थिक सुधारणा यांमुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरत आहेत.
बेस मेटल्स: आज एलएमईवर बेस मेटलने घसरण अनुभवली तर एलएमई तांब्याने १.१८% ची वृद्धी घेतली व ते ६७८९.० डॉलर टनांवर बंद झाले. एसलएम कॉपरचा साठा १५ वर्षांमधील निचांकी स्तरावर गेला. यामुळे तेलाच्या किंमती घसरण्याला आणखी मर्यादा आल्या. अमेरिका-चीनदरम्यान्या वाढता ताण व जागतिक आर्थिक सुधारणेच्या चिंतेमुळे मेटल आणि कॉपरचे दर घसरले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर कॉपरकडे दु्लक्ष केले जाईल, अशी अपेक्षा आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये अमेरिकेचे मतदान होणार आहे. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी चीनबरोबरचे सर्व संबंध संपवण्याचे म्हटले आहे. त्यामुळे औद्योगिक धातूच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे. चीनची निर्यात सलग तिस-या महिन्यात मजबूत स्थितीत झाली. यामुळे बेस मेटलला आधार मिळाला. तर दुसरीकडे, चीनची अॅल्युमिनिअमची आयात ३९१,२९७ टन झाली, जी मागील महिन्यात या दशकातील सर्वोच्च पातळी ठरली.