भारतात लाखो लोकांना गुंतवणूकीत सहज प्रवेश मिळवून देण्याचे ग्रोचे उद्दिष्ट
मुंबई : ग्रो या लोकप्रिय गुंतवणूक प्लॅटफॉर्मने वायसी कंटीन्युटीच्या नेतृत्वात सी सिरीजमध्ये ३० दशलक्ष डॉलर (२२० कोटी)ची निधी उभारणी केली आहे. प्रोपेल व्हेंचर्स या आधीच्याच गुंतवणूकदारांनीही यात सहभाग नोंदवला. वायसी कंटीन्युटीची ही भारतातील पहिलीच गुंतवणूक आहे.
‘ग्रो’ च्या तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी तसेच अभियांत्रिकी, उत्पादन तसेच वृद्धीच्या क्षेत्रात प्रतिभावंत घेण्यासाठी हे भांडवल वापरले जाईल. या निधीचा काही भाग, भारतातील वित्तीय शिक्षणविषयक उपक्रम ‘अब इंडिया करेगा इन्व्हेस्ट’यासाठी वापरला जाईल.
‘ग्रो’ चे सह संस्थापक व सीईओ ललित केशरे म्हणाले, “ मागील काही वर्षांत आम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील लाखो गुंतवणूकादारांसाठी हा साधा व पारदर्शी मार्ग आहे. गुंतवणुकदारांना त्यांच्या संपत्तीचे नियोजन करण्याचा चांगला अनुभव प्रदान करणे, हे आमचे ध्येय आहे. आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणुकदारांशी भागीदारी करण्यात आम्हाला आनंद आहे. वायसीेने आमच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आताची गुंतवणूक ही आमच्या उद्दिष्टांप्रती मार्गक्रमण करण्यास गती देईल.”
२०१७ मध्ये सुरुवात झालेल्या ग्रो हा भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा गुंतवणूक मंच आहे. यावर ८० लाख नोंदणीकृत युझर्स आहेत. मंचावर सध्या स्टॉक ब्रोकिंग आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. दोन्ही उत्पादनांनी अपवाद सोडले तर चांगली वृद्धी घेतली आहे. ग्रो दर महिन्याला १.५ लाखांपेक्षा एसआयपीची नोंद केली आहे. लाँचिंगनंतर तीन महिन्यात मासिक तत्त्वावर १ लाखाहून अधिक डिमॅट खाती जोडली गेल्याने ग्रो स्टॉक्समध्येही प्रचंड वाढ झाली.