नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका कठिण टप्प्यातून जात असून अशा परिस्थितीत ज्या कंपन्या या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणार नाहीत अशा कंपन्यांना तग धरणं कठीण होईल असे ते म्हणाले. कॉर्पोरेट कम्युनिकेशन अधिकाऱ्यांनी आणि तज्ञांनी अधिक सजग आणि काळजीपूर्वक राहावे असे आवाहन त्यांनी केले. ‘SCOPE’ कॉर्पोरेट कम्युनिकेशन परिषदेच्या उद्‌घाटनपर सत्रात ते बोलत होते.

कॉर्पोरेट कम्युनिकेशनवरच्या कॅलिडोस्कोप मासिकाचे प्रकाशनही यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे डिजिटल परिवर्तन, त्याचा प्रभाव इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातले प्रतिनिधी आणि संबंधित मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित आहेत.