क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.