मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरळीत करायचे प्रयत्न सुरु असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. त्या आज अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतल्यानंतर बोलत होत्या.
रुग्णालयातली वॉर्डची पाहणी, डॉक्टरांची उपलब्धता, परिचारिकांची रुग्णांना दिली जाणारी वैद्यकीय सुविधा, कर्मचारी, अतिदक्षता विभाग, औषध, स्वच्छतेचा आढावा घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी होत असताना प्रत्येकानं आपलं दायित्व पार पाडलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. पेडणेकर यांनी पावसाळ्यात वरळीतल्या बी.डी.डी. चाळी आणि परिसरात झालेल्या नुकसानीचीही आज पाहणी केली.