नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, ते आज कॅनडा इथं सुरु असलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या परिषदेत ते बोलत होते. भारतातली कर प्रणाली सुलभ असल्यामुळे करदाते आणि कंपन्या समाधानी आहेत.
उद्योग सुलभतेत भारत १४२ क्रमांकावरुन ६३ क्रमांकावर आला आहे. संस्थात्मक गुंतवणूकीत ७० अब्ज अमेरिकी डॉलर ने वाढ झाली आहे, तसंच थेट परकिय गुंतवणूक २० टक्यांनी वाढली आहे, असं ते म्हणाले.