मुंबई  : सन 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळासाठी विभागनिहाय मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अमरावती आणि नाशिक या विभागांनी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्याला आज मान्यता देण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

आज मंत्रालयात खरीप 2018 दुष्काळ अनुदानासंदर्भात मदत व पुनर्वसन उपसमितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.

या दोन्ही विभागाची मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त निधीची एकूण रक्कम31835.90 लक्ष इतकी असून याला मान्यता देण्यात आली आहे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.