नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला.

दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद  केले. त्यांनी विविध क्षेत्रातील सहकार्याच्या निरंतर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात अस्तित्त्वात असलेल्या अफाट क्षमतेबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली आणि औषधनिर्माण क्षेत्रातील भारतीय आणि तुर्कमेन कंपन्यांच्या संयुक्त सहकार्याच्या यशाची दखल घेतली.

दूरध्वनीबद्दल आणि भारताशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल राष्ट्रपतींनी तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्र्पतींचे  आभार मानले.