**EDS: TWITTER IMAGE POSTED BY @BJP4India ON FRIDAY, JULY 17, 2020** New Delhi: Prime Minister Narendra Modi speaks at the High-Level Segment of ECOSOC via video conferencing, in New Delhi. (PTI Photo)(PTI17-07-2020_000207B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती, त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला. कोरोनावरील 3 लसींची निर्मितीप्रक्रिया सध्या सुरु असून, 2 लसींच संशोधन दुसऱ्या टप्प्यात तर एका लसीच संशोधन तिसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.

त्यासाठी भारतीय संशोधन संस्थांनी बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आदी शेजारील देशांसोबत सहकार्य करार केले आहेत.

भारताने संशोधित केलेल्या कोरोना  लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण जगातील इतर देशानांही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचा ही वापर केला पाहिजे अशी सुचना प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी कोविड -19 वरील लस निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष गटाने, विविध राज्यसरकारे आणि या क्षेत्रातील तज्ञांच्या साहाय्याने, लसीची साठवण, वितरण आणि व्यवस्थापन या बद्दल तयार केलेल्या, संभाव्य आराखड्याचं विशेष सादरीकरण प्रधानमंत्र्यांसमोर केलं.