सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आषिशकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव,अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर येथे भिंत पडून मयत झालेले मंगेश गोपाळ अभंगराव यांच्या पत्नी अश्विनी मंगेश अभंगराव, गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी लता कोळी, राधा गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी रतन शिरसाट, संग्राम जगताप (रा. भंडीशेगाव) यांच्या आई शोभा जगताप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील सखाराम गायकवाड यांच्या पत्नी धनाबाई गायकवाड, माढा तालुक्यातील शिवाजी यादव यांच्या पत्नी वर्षा यादव, उद्धव खरात यांच्या पत्नी सोजरबाई खरात, कलावती विठ्ठल करळे यांचा मुलगा लाला करळे, शंकर देवकर (सावळेश्वर, ता. मोहोळ) यांच्या पत्नी रेणुका देवकर आणि शंकर चवतमाळ (श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांचे वडील बाळासाहेब चवतमाळ यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.