नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजयादशमी अर्थात, दसऱ्याचा उत्सव म्हणजे, सत्याचा असत्यावर विजय असंच तर हा तर संकटावर धैर्यानं मिळवलेला विजय आहे. म्हणूनच सध्या कोरोनाविरुद्ध आपण ज्या संयमानं लढाई लढत आहोत, त्यातही आपला विजय निश्चित आहे असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
ते आज आकाशवाणीवरून आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बोलत होते.दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मोठ्या उत्साहात दसऱ्याचा साजरा करत आलो. यावेळी मात्र आपल्याला तो संयमानं साजरा करावा लागतोय, हाच संयम येऊ घातलेल्या दिवाळी आणि ईदच्या सणासह सर्वच सणांमधे दाखवावा लागणार असल्याची गरजही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून व्यक्त केली.
स्वच्छता कर्मचारी, घरकाम करणाऱ्या व्यक्ती,स्थानिक भाजी आणि दूध विक्रेते, सुरक्षा रक्षक अशा समाजातल्या घटकांची, आपल्या जगण्यात किती महत्वाची भूमिका आहे, हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कळलं, याची जाणिव त्यांनी करून दिली. सणांचा आनंद घेत असताना अशा घटकांनाही त्यात सामावून घ्यावं, खरेदी करताना लोकल फॉर व्होकलचा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन मोदी यांनी आजच्या मन की बात मधून केलं.