नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खरीप हंगामातील धानाची खरेदी वेगानं सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ तसंच गुजरात या राज्यातून ही खरेदी केली जात आहे.

आतापर्यंत १९७ लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली असल्याचं केंद्रीय ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी साडे तेवीस टक्क्यानं अधिक आहे.

याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यातून ४५ लाख १० हजार मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांची किमान हमी भावानं खरेदी करण्यात आली आहे.