मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथल्या एका रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून कृषी विभागानं १८ लाख ७८ हजार रूपये किंमतीची खत जप्त केली आहेत.

जिल्हा कृषी गुणनियंत्रण पथक ३० ऑक्टोबर रोजी पलूस इथं गेलं होतं. त्यावेळी एका कृषी उद्योग समूहामध्ये त्यांना बोगस खताची पोती आढळून आली. त्यानंतर कृषी विभागानं ही कारवाई केली असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली.