पुणे : कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणा-या रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व ॲग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हयातील उमेदवार, प्रशिक्षण संस्था, कृषी क्षेत्रातील शासकीय व खाजगी आस्थापनांसाठी दि.6 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या सत्रामध्ये श्रीमती सायली महाडिक, प्रादेशिक प्रमुख, भारतीय कृषी कौशल्य परिषद या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रामध्ये नि:शुल्क सहभाग घेता येणार असून Google Meet च्या माध्यमातून सहभागी होणे आवश्यक आहे. याकरिता http:meet.google.com/ xxf-sbfe-veh या लिंकवरून सहभागी होता येईल, या ऑनलाईन सत्रामध्ये उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अनुपमा पवार यांनी केले आहे.