मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतररत्र चित्रपटगृह, नाट्यगृहे आणि प्रेक्षागार पुन्हा सुरु करायला राज्य सरकारने आज परवानगी दिली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. उद्यापासून ५० टक्के आसनक्षमतेने ही सर्व मनोरंजन केंद्रे सुरु करायला परवानगी राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

या ठिकाणी खाद्य पदार्थ आत घेऊन जाता येणार नाहीत. याबाबतची प्रमाण कार्यपद्धती सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्रशासन जारी करेल, असे या आदेशात म्हटले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या जलतरणपटूंसाठीचे जलतरण तलावही उद्यापासून सुरु करता येतील, असे या आदेशात म्हटले आहे. योगसंस्था तसेच बॅडमिटन, टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी यासारखे बंदिस्त जागेतले खेळ निर्जंतुकीकरणाच्या योग्य उपाययोजना आणि सुरक्षित अंतर पाळून सुरु करायलाही राज्य सरकारने परवानगी दिली आहे.