मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कृषीपंप वीज धोरण २०२० अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
शेतकऱ्यांकडच्या थकीत कृषी वीज देयकांची टप्प्याटप्प्यानं वसुली केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
२०१५ पूर्वीची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचं विलंब शुल्क आणि व्याज पूर्णतः माफ करून केवळ मूळ रक्कम वसुल केली जाईल, असंही ते म्हणाले.