नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली. २०२१- २०२६ चे परकीय व्यापार धोरण आणि देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलायची संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

राज्यांच्या सहकार्यानं परिवर्तनाचं ध्येय गाठत शक्तीशाली देश बनण हे आपलं लक्ष्य असल्याचं गोयल या बैठकीत म्हणाले. व्यापाराच्या पारंपरिक पध्दती बदलत आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरजही व्यक्त करत मुक्त व्यापाराचं त्यानी समर्थन केलं. २०२५ पर्यन्त ५ ट्रीलीयन डॉलर सकल देशांतर्गत उत्पन्नाचं लक्ष्य गाठू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.