मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी शक्ती विधेयकाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या विधेयकात बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा प्रस्तावित केली आहे.

ॲसीड हल्ला प्रकरणात दंडाची तरतूद असून, ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार तसंच प्लास्टिक सर्जरीसाठी देण्याचं या विधेयकात प्रस्तावित आहे.