मुंबई (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रातील अग्रणी आणि महाराष्ट्राचे माजी सहकार तसंच वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली. महासंघाच्या संचालक मंडळाच्या २१४व्या शिखर बैठकीत ही निवड झाली.

दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसेपाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घकाळापासून संबांधित असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन, मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.