नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, तिथल्या प्रतिष्ठेच्या लीजन ऑफ मेरिट या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. भारताचे अमेरिकेतले राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्विकारला.

हा पुरस्कार म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व, तसंच मोदी यांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला यावी यासाठी, तसंच भारत आणि अमेरिकेतल्या राजनैतिक भागिदारी अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि जागतिक समृद्धी आणि शांततेला चालना देण्यासाठी मोदी यांनी दिलेल्या योगनादानाचा सन्मान आहे, असं यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अॅबे यांनाही या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे.