नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, काल २६ हजाराहून जास्त कोविड रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या ९६ लाख ६३ हजाराहून जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. केविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६९ शतांश टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

काल २३ हजार ९५० नव्या रूग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधितांची देशभरातली एकूण संख्या १ कोटी ९९ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सध्या देशातला कोविड मृत्यूदर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका असून, तो जगभरातल्या कमी आकडेवारीपैकी एक आहे.

गेल्या चोवीस तासांत ३३३ रुग्ण मृत्युमुखी पडले असून कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ४४४ झाली आहे. काल १० लाख ९८ हजारापेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. आत्तापर्यंत १६ कोटी ४२ लाख नमुने तपासण्यात आले आहेत.