मुंबई (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं ध्येय साकारण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
काल मुंबईत लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त ‘राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासा’च्या वतीनं गीता जयंती कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
गीता हा जगाकडे तसंच जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत दृष्टी देणारा ग्रंथ असल्याचं राज्यपाल म्हणाले. दिनकर स्मृती न्यास संस्थेचं कार्य निरंतरपणे चालू राहावं, अशा शुभेच्छा देत राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेला पाच लाख रुपये देणगी जाहीर केली.
राज्यपालांनी काल बोरीवली इथं अटल स्मृती उद्यानात वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. अटल स्मृती उद्यान परिसरालाही राज्यपालांनी भेट दिली.