नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन  – ‘न्यूमोसिल’ या लसीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल केलं.

जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया असून त्यांपैकी २० टक्के बालके भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातील सर्व बालकांसाठी देणे शक्य नव्हते.

आता सीरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल, असं मत डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं.