नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वदूर वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे, असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी आकाशवाणीचा दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करत असतानाही देशात सुमारे दोन कोटी ८० लाख  नवीन ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक घरात २४ तास वीज वितरित करण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नात कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गेल्या सहा-साडे  सहा  वर्षांमध्ये रालोआ सरकारच्या कार्यकाळात भारतानं अतिरिक्त वीज निर्मिती करणारं राष्ट्र असा दर्जा प्राप्त केला आहे, भारत आता  देशांतर्गत मागणी समवेत बांगलादेशसह इतर शेजारी राष्ट्रांनाही वीज पुरवण्यात सक्षम झाल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले.