मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील जवळपास ११ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील उर्वरीत काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे.
खर्च ठेव प्रणालीनुसार नवी मुंबई सिडको महामंडळातर्फे महामेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मेट्रो अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी ६ स्थानकांच्या उभारणीचे काम कोविड काळात अपेक्षित गतीने होत नव्हते. उर्वरीत कामे लवकर पूर्ण करणे तसेच प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या निकषांचा विचार करून हे काम महामेट्रोला देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.