पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या कोविड-शिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी आग लागली.

आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक पण रवाना झाले आहे.

बीसिजी लस तयार करण्यात येणाऱ्या इमारतीला ही आग लागली असून, कोरोना लस तयार करण्यात येणारी इमारत सुरक्षित आहे.आगीतून ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या मनपा आयुक्तांना यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.