नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ समितीनं मिलिंग आणि बॉल खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात अनुक्रमे ५२ आणि ५५ टक्के वाढ केली आहे.

मिलिंग खोबऱ्याचा किमान आधारभूत दर ९ हजार ९६० रुपये प्रतिटन होता, तो आता १० हजार ३३५ रुपये प्रतिटन इतका करण्यात आला आहे. तर, बॉल खोबऱ्याचा दर ६ हजार ८०५ रुपये प्रतिटनावरुन १० हजार ६०० रुपये प्रतिटन इतका केला आहे. या निर्णायाचा लाभ तटवर्तीय १२ राज्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे.