मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर, सोन्याचे दर खाली आले. तर सौदी अरेबियातील उत्पादन कपात वाढूनही कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. वाढती कोव्हिड-१९ रुग्णसंख्या आणि नव्या आर्थिक निर्बंधांमुळे कच्च्या तेलावर दबाव आला. झिंकने सर्वाधिक घसरण घेतली. बेस मेटलने संमिश्र ट्रेंड दर्शवले. चीनने सर्वोच्च औद्योगिक धातूंची मागणी नोंदवली. मात्र अधिक विस्तारासाठी मार्ग नसल्याने गुंतवणूकदार सावध झाले व औद्योगिक धातूच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर, स्पॉट गोल्डने ० .२५% ची घसरण अनुभवली व ते १,८५० डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. गुंतवणूकदारांनी दीर्घ काळ प्रतिक्षा केलेल्या अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेजमुळे महागाई वाढू शकते. यामुळे पिवळ्या धातूची मागणी वाढू शकते, कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या स्थितीत सोने तारक ठरू शकते.
विषाणूची पु्न्हा लाट आल्याने ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये कठोर निर्बंध लागल्याने सोन्याचे नुकसान झाले. तथापि, कोव्हिड-१९ चे रुग्ण सतत वाडत असल्याने तसेच अमेरिकेेकडून अतिरिक्त प्रोत्साहन मदतीच्या आशेने व अमेरिकेची कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याच्या दरांना काहीसा आधार मिळू शकतो.
कच्चे तेल: कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढीमुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.०४% असे किरकोळ खाली घसरलो. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लागल्याने कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम झाला. अमेरिकी डॉलर घसरल्यानंरतही कच्च्या तेलाची मागणी घटली. अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे तेलाच्या दरांवर आणखी दबाव आला.
तथापि, जगातील प्रमुख उत्पादक सौदी अरेबियाने साथीमुळे लागलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, एक दशलक्ष बीपीडी उत्पादन कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळेल. विषाणूच्या उद्रेकामुळे मागणीची चिंता वाढली, त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर घसरले. याउलट अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्यामुळे दरांच्या घसरणीवर मर्यादा येऊ शकते.
बेस मेटल्स: बेस मेटलच्या समूहात संमिश्र परिणाम दिसले तरी झिंकने सर्वाधिक घसरण अनुभवली. अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन व अतिरिक्त प्रोत्साहनामुळे बेस मेटलवरील नुकसानीवर मर्यादा राहिल्या नाहीत. चीनमधून ययेणारी मागणी शिखरावर पोहोचल्याने आणखी विस्तारास जागा राहिली नाही. त्यामुळे गुंतवमूकदारांमध्ये भीती निर्माण झाली व परिणामी औद्योगिक धातूंचे दर घसरले. तसेच चीनमध्ये साथीची पुन्हा लाट आल्याने मागणीवर परीणाम होऊन बेस मेटलच्या अर्थकारणावर परिणाम झाला.
एलएमईच्या नियंत्रणाखालील वेअरहाऊस व शाघाय फीचर्स एक्सचेंजमधील वाढत्या साठ्यामुळे झिंकने घसरणीचा व्यापार केला. वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२० मध्ये जागतिक क्रूड स्टीलची मागणी ५.८% नी वाढली तर चीनच्या स्टील उत्पादनात ७.७% नी वाढ झाली.
तांबे: एलएमई कॉपरचे दर ०.५% नी वाढून ८,००८.५ डॉलर प्रति टनांवर पोहोचले. कारण चीनने संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट दर्शवली. तथापि, अमेरिकी डॉलर घसरल्याने लाल धातूंच्या मागणीला आधार दिला. अमेरिकी डॉलर घसरल्याने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडून अतिरिक्त मदतीची आशा असल्याने औद्योगिक धातूंच्या किंमतींना थोडा आधार मिळू शकतो.