नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १ हजार ३०९ ग्राम पंचायती ऑनलाईन  सुविधांसह व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या २७९ ग्राम पंचायतीं ऑप्टीक्ल फायबर केबलव्दारे जोडल्या आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या १६ तालुक्यांपैकी नांदेड, अर्धापूर, कंधार, धर्माबाद आणि नायगांव या पाच तालूक्यांमधे ऑप्टीक्ल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. इतर ११ तालुक्यांमधे केबल टाकण्याचं काम मंदावलेलं आहे