मुंबई (वृत्तसंस्था) : शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

मुंबईत राज्य शुश्रुषा आणि निमवैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते.

रुग्ण बरा होण्यामध्ये डॉक्टरांबरोबरच परिचारिकासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं.