मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागानं मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज करणं आणि allotment घेण्यासाठी १६ फेब्रुवारी, म्हणजे येत्या मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुदत दिली आहे.

Allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपला प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करता येईल. सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही २०२०-२१ साठी शेवटची संधी असेल, असं विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.